Sunday, April 16, 2006

नवी सुरुवात

आपण जे 'नाही' आहोत ते 'असण्याचा' आभास निर्माण करण म्हणजेच "Stupid" असण अशी stupid या शब्दाची नविन व्याख्या oprah न परवाच्या कार्यक्रमात केली.
म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसली तरी इतर चार लोकाना ती आवडते म्हणुन आपल्याला पण आवडते अस म्हणन,पटल नाही तरी आपण वेगळं पडन्याच्या भितीन पटल अस सांगण अशा कित्येक गोष्टी यात येतील.
एकुण काय कि खोट्या मुखवट्याखाली स्वताला दडपुन टाकायच.
स्वताला नेमक काय हवय ते कधीच न कळण हे आणखी एक stupid असण्याच लक्षण.
आपल्या पैकी कित्येक जण अस कितीतरी वेळा करीत असतील. गरज पडेल तेव्हा,वेळेनुसार आपण मुर्ख बनतच असतो.
कारणं अनेक ,पण बरेचवेळा आपल खर रुप झाकण्याचा आपण प्रयत्न करीत असतोच.
आज हे लिहिण्याच कारण म्हणजे खऱ्या अर्थान मी एका नविन विश्वात, माझ्या आवडत्या जगात पाऊल टाकत आहे.
Yeah, मी परत विद्यार्थी व्हायच ठरवल आहे.पण यावेळेस माझ्या आवडत्या विषयाची. समोर उभ असलेल चांगल करियर(पण मला फ़ारस न आवडनार) आणि मेहनतीन मिळवलेला अनुभव या सगळ्याला मागे टाकुण मी नव्यान, नवी डीग्री घ्यायच ठरवलय.
बऱ्याचजणानी मला वेड्यात काढलय. Dream Job वैगरे काही नसत असही सुनावलय. पण माझा निर्धार अगदी पक्का झालाय.
काही स्वप्न उघड्या डोळ्यानी ,जागेपणी पाहिली तरीही ती खरी होतात का ते मला माहित नाही.
पण मला हे नक्कीच माहित आहे की अस ,हाताशी असलेला हुकमी एक्का टाकुन नव्यान हा जुगार खेळण तितक सोपही नाही.
पण कधी कधी ना मी हे करणारच होते. माझा निर्णय कदाचीत बरोबर ठरेल आणि कदाचीत अपयशी सुद्धा ठरेल.
पण निदान मनाजोग काम करण्याच समाधान नक्कीच मिळेल.
नव्यान मला जे आवडत तेच करण आणि ज्यात माझ मन कधीच रमल नाही त्याचा त्याग करण हे अगदी 'Dream come True' सारख आहे.
त्यामुळ सध्या तरी 'Am I being stupid? ' या प्रश्नाच उत्तर 'No,I am not" असच आहे.

16 comments:

Y3 said...

विचार आवडले.
नवीन वाटेवरील वाटचालीसाठी शुभेच्छा...

यतीन

Rahul said...

"Stupid " chi definition khupach avadli. pahilya char oli vachlyavar me swathachi stupidity kashi dakhavat hoto he athavun khup haslo.

Anyways, Best of luck for your new phase in life.

Nandan said...

रजनीगंधा, नवीन प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. 'वेडे'पणाच्या व्याख्येवरून 'थोडे वेडे व्हा' हा लघुनिबंध आणि कुसुमाग्रजांची 'उजेडात ठरू वेडे' ओळ आठवली.

शैलेश श. खांडेकर said...

साहसे श्री: प्रतिवसति ।

Rga said...

राहुल lol,
यतिन,नंदन,शैलेश मनापासुन thanks.
नंदन तुला सगळ मराठी साहित्य पाठ आहे अस मला वाटायला लागलय.खरच:)
RGA

Anonymous said...

नमस्कार!!!
आज पहिल्यांदाच तुमचा ब्लॉग वाचला. तुमची विचारसरणी आवडली. नवीन वाटेवरील वाटचालीसाठी शुभेच्छा तर आहेतच पण या वाटेवरील वाटचाल कशी होत आहे ते वाचायलाही खुप आवडेल.
btw, oprah rocks!! what say?

Nandan said...

नाही हो, तसे नव्हे. नववीत याच विषयावर निबंध लिहावा लागला असताना गोळा केलेले संदर्भ आठवले एवढंच. :)

kavs said...

Rajanigandha, this is the first time I visited your blog. "Godadhi" vachli ani ithe office chya cubicle madhe basun aaji-ajobanchya aathvaninni man vyakul zale...dole nuste bharun ale nahit tar sarkhe vahu lagle. Khuup chhan lihile ahe, asech lihit chala...

Rga said...

धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल.परत काही लिहिन तेव्हाही वाचाल एवढीच आशा.:)

मनोगते said...

तुमच्या ध्येयपूर्तीसाठी शुभेच्छा!!
आपल्याला नेमकं काय हवं आहे ते समजणं आणि ते समजल्यावर प्रवाहाविरुद्ध जाऊन ते मिळवण्याची धडपड करणं ह्या दोन्ही गोष्टी सगळ्यांना साध्य होत नाहीत, तुम्हाला झाल्या.. सुदैवी आहात. तुमच्या प्रयत्नांना यश लाभो आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुमची भरभराट होवो ही सदिच्छा!

Gayatri said...

'आपण जे अनुभव, विचार अगदी खाजगी, व्यक्तिगत समजत असतो तेच खूप वेळा सर्वांत वैश्विक असतात' अशा अर्थाचं वाक्य डॉ. अभय बंगांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' मध्ये वाचलं होतं. 'नवी सुरुवात' वाचताना या वाक्याची यथार्थता जाणवली. खूप छान वाटलं. There might never be a 'dream job' , because a job is often inseparably intertwined with 'reality'..but there is always a 'dream self', and one has every chance to capture it if one never stops dreaming and acting upon it.
शुभास्ते पन्थान:, रजनीताई.

Rga said...

मनोगते अगदी खर आहे.शुभेच्छा बद्दल मनापासुन धन्यवाद.
गायत्री योगायोग म्हणजे तु लिहिलेल वाक्य माझ्याही कस काय कोण जाणे तसच्या तस लक्षात होत.:) इकडुन तिकडुन शेवटी आपण सगळे एकच विचार करीत असतो कि काय कोण जाणे.
असो. शुभेच्छा बद्दल असंख्य धन्यवाद गं.

Vishal said...

रजनीगंधा,
नेहमीप्रमाणेच पोस्ट सुंदर आहे. वरती एवढे छान छान प्रतिसाद असल्यामुळे मी वेगळं काही लिहीत नाही.
तुमच्या पुढील ब्लॉग आणि वैयक्तिक वाटचालींसाठी शुभेच्छा.

Parag said...

नमस्कार,

लेख छान आहे. आवडला. नवीन वाटचाली साठी शुभेच्छा !

rupesh said...

best of ......!
i don't believe in luck .
:)

Nandan said...

रजनीगंधा, तुमची नवीन वाटेवरची वाटचाल उत्साहवर्धक होत असेल, अशी आशा करतो. गायत्रीच्या ब्लॉगवर ही लिंक मिळाली कृष्णदेव कुंटेच्या पुस्तकाची. त्याच्या प्रस्तावनेच्या पहिल्या दोन पानांत एक कविता दिली आहे. ती येथे वाचता येईल -
http://www.bio.utexas.edu/grad/krushnamegh/Moorings/RanvedaForeword1.htm

http://www.bio.utexas.edu/grad/krushnamegh/Moorings/RanvedaForeword2.htm
शुभेच्छा.