Saturday, December 31, 2005

संकल्प

काहीतरी लिहाव आणि सगळ्यानी ते वाचाव अस मला फ़ार पुर्वी पासुनच वाटत आलय. पण एकतर आळशीपणा आणि दुसर म्हणजे कुणी वाचल नाही तर वाईट वाटण्याची भिती!!!! असो. आज, आता मात्र ठरवल आहे;नव्या वर्षाचा संकल्प म्हणा हवा तर पण काहीतरी खरडायचच . मग कुणी वाचो अगर न वाचो. स्वताच्या समाधानासाठी, आनंदासाठी. अजुनही तसे बरेच संकल्प केलेतच म्हणजे नेहमीचाच ( आणि कधीही तडीस न जाणारा ) घिसापिटा डायरी लिहिण्याचा वैगरे.पण यावर्षी खरच लिहिन. नक्की. एखादतरी चित्र काढायच प्रत्येक आठवड्याला असही मनाशी घोळत आहे बघु कस कस जमतय. कलेना काही पोट भरणार नाही नं. म्हणुण मग वेळच्या वेळी हिशोब लिहीण्याचीही सवय लावुन घ्यायच ठरवल आहे. हे वर्ष खूप संस्मरणीय जाणार अस मात्र फ़ार वाटतय. म्हणजे नविन जॉब, मोठ घर अस बरच काही काही या वर्षाच्या संकल्पाच्या यादीत साठवलय. त्यामुळ उगाचच जणु हे सार काही उद्याच्या उद्या म्हणजे एक तारखेला घडनार असल्या सारखाच मला आनंद होतोय. जणु काही एक दिवसाने आणि हो सालातल्या एक बदलत्या आकड्याबरोबर माझ्या ही आयुष्यात हे असेच मला अपेक्षीत बदल घडनार आहेत. बघुया काय आहे देवाच्या मनात ...

Happy New Year

New Year's Day.......
Everything is in blossom!
I feel about average.......