बरेच दिवसात काही लिहिल नाही. काही सुचलंच नाही . काल मैत्रिणीशी बोलताना लक्षात आल कि गेल्या वर्षात "गोष्टी" लिहायला सुचल्या नसल्या तरी पुष्कळ नवीन गोष्टी शिकल्या व केल्या जरुर.
मुलीसाठी ड्रेस शिवले. घरासाठी वस्तू तयार केल्या. झाडं लावली. बागकाम केले. आणि बरेच पदार्थही केले. मनात विचार आला नवीन ब्लॉग काढण्यापेक्षा , याच गोष्टी इथे शेअर केल्या तर. मग सरळ ब्लॉग चे नावही बदलून टाकले.
तर आता या पुढे अशाच काही गोष्टी लिहित जाईन. सुरुवात मुलीसाठी ड्रेस शिवला त्यापासून करावी म्हणते. पुढचे पोस्ट त्यावरच टाकीन.
(हेडर मधला फोटो मी काढलेला नाही. )